चिपळूण-गुहागर तालुका मर्यादित मॅरेथॉन स्पर्धेकरिता विद्यार्थी सहभागी करणे बाबत.

प्रति
मा.मुख्याध्यापक
जि. प. शाळा.....
ता. चिपळूण
जि. रत्नागिरी

विषय: चिपळूण-गुहागर तालुका मर्यादित मॅरेथॉन स्पर्धेकरिता विद्यार्थी सहभागी करणे बाबत.

महोदय,
       मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी मार्गताम्हाणे गेली दोन वर्षे जिल्हास्तरीय  मॅरेथॉनचे आयोजन करीत आहे!२०२१-२२ हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतभर साजरे केले जात आहे,याचे औचित्य साधून आम्ही विद्यार्थी, युवक,समाज यांच्यामध्ये देशाविषयी कर्तव्य भावना जागृत व्हावी ,आरोग्य विषयक जागृती तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी रविवार दिनांक १६जानेवारी २०२२ रोजी "Run for Nation- एक धाव देशासाठी"अशा घोषवाक्याला समर्पित असणारी मॅरेथॉन आयोजित करीत आहोत, तरी आपण आपल्या विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी करावे असे नम्र आवाहन करीत आहोत!     सोबत दिलेल्या नमून्याद्वारे आपल्या प्रवेशिका त्वरित पाठवून सहकार्य करावे ही नम्र विनंती! 

आपले विश्वासू
प्रा. डॉ. सत्येंद्र विजय राजे
स्पर्धाप्रमुख
9422878705
श्री. राकेश खांडेकर
सहा. स्पर्धाप्रमुख, क्रीडाशिक्षक
9049038443

Comments