अणुस्कुरा घाटातील दरड हटवली-वाहतुक सुरळीत सुरू
राजापूर:
पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग अशी ओळख असलेल्या ओणी पाचल अणुस्कुरा मार्गावर अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांनी अवघ्या चार तासात हटविली असून या मार्गावरील सर्वप्रकारची वाहतुक सुरळीत सुरू झाली आहे. तशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरचे उपअभियंता एस. एस. दुधाडे यांनी दिली आहे.
मंगळवार सकाळी ८ वाजता अणुस्कुरा घाटात अचानकपणे दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे घाटातील दोन्ही बाजुकडील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एस. दुधाडे, शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी कामगार व यंत्रसामुग्रीसह तात्काळ अणुस्कुरा येथे धाव घेत रस्त्यावर आलेले दगड व माती पुर्णपणे बाजुला करून अवघ्या चार तासात वाहतुक सुरळीत सुरू केली आहे.
Comments
Post a Comment