चिपळूण: शिवसेनेची उद्याजिल्हा परिषद गटनिहाय बैठका
चिपळूण: शिवसेनेची जिल्हा परिषद गटनिहाय बैठक दि. ९ डिसेंबर
रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तालुकाप्रमुख
प्रताप शिंदे यांनी दिली आहे. या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, आ. भास्कर जाधव, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, क्षेत्रप्रमुख बाळा कदम,उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार
आहे. या बैठकांमध्ये दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वा.कोकरे जि.प. गटाची बैठक विठ्ठल मंदिर असुर्डे येथे होईल. सकाळी ११:३० वा. आगवे येथे सावर्डे जि. प. गटाची बैठक, दुपारी १२:३० वा. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी मालदोली जि.प गटाची बैठक होईल. ३
वा. कळंबस्ते येथील बाबूशेट्ये यांच्या निवासस्थानी पेढे जि.प. गटाची
बैठक, सायंकाळ ४:३० वा. अलोरे जि.प. गटाची बैठक खडपोलीतील दाजी चांदीवडे यांच्या निवासस्थानी, सायं. ६ वा. पोफळी जि. प.गटाची बैठक बळीराम गुजर (मुंढे विभागप्रमुख) यांच्या निवासस्थानी. सायं. ७ वा. खेड जि.प. गटाची बैठक स्वामी मंगल कार्यालय बहादूरशेख नाका येथे होईल. रात्री ८ वा. चिपळूण शहराच बैठक शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात होईल. या बैठकांना शिवसेना पदाधिकारी, सर्व आघाडीप्रमुख, नगरसेवक, सरपंच तसेच जि.प., पं.स. सदस्य आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख प्रताप शिंदे व शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी केले आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923
Comments
Post a Comment