"जैतापूरची बत्ती लागणार "
कृपया प्रसिद्धीसाठी
-------------------------------------
"जैतापूरची बत्ती लागणार "
स्वागत
●रत्नागिरी: रत्नागिरीतील जैतापुर पंचक्रोशीत सहा अणुभटया उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे अणुउर्जा मंत्री जितेंद्रसिंह यानी आज राज्यसभेत दिली 1650 मेगावेटच्या सहा अणुभटयातून 9900 मेगावॅट वीज निर्मिती होईल.
●माडबन ,मिठगवाणे ,करेली निवेली ,वरची वाडी आदी पाच गावातील जमिन संपादीत केली असून 95 % लाभार्थीनी म्हणजे 1845 बाधित जामिनदारानी नुकसानभखाई स्विकारली आहे .काही किरकोळ जामिनदार उरले त्यांचे केवळ पत्ते उपलब्ध नसल्याने राहीले आहेत .कंपनीने जमिनीला संरक्षक भिंत घातली आहे .
●अणुउर्जा स्वच्छ व पर्यावरणपुरक आहे . देशाची दिर्घकालीन उर्जा सुरक्षा व शाश्वत आधारावर निर्माण करण्याची क्षमता आहे .भारतात 64 % उर्जा थर्मल म्हणजे कोळशावर तर 18 % हायड्रोइलेक्ट्रीक तर 15% उर्जा रिन्यूएबल स्त्रोतामधून उपलब्ध होते . भारतात अणूउर्जा जेमतेम 3 % निर्माण होते.याउलट फ्रान्समध्ये 74.6 % अणुर्जा तयार होते तर अमेरिकेत 104 रिऑक्टरद्वारे एक लाख मेगावॅट अणुउर्जा तयार होते .अणुउर्जाच्या सुरक्षे संबधी माजी राष्ट्रपति व आंतरराष्ट्रीय किर्तीचे तज्ञ डॉ अब्दुल कलाम तसेच अणूशास्त्रज्ञ डॉ आनिल काकोडकर यानी स्पष्ट निर्वाळा दिला आहे .भारतात आतापर्यत 755 अब्ज मेगावॅट तयार झाली हे लक्षात घेतले पाहीजे.
●देशाचे अणूउर्जा धोरण ,संसदेची मान्यता ,तज्ञांचा निर्वाळा आणि सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोतर्ब आणि गेल्या 50 /55 वर्षात देशातील 20 अणुउर्जा प्रोजेक्टमध्ये कोणताही अपघात झालेला नाही हे वास्तव लक्षात घेतले तर कोकणवासीयानी जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाच स्वागत केले पाहीजे मुंबईसारखे मोठे शहर पायथ्याशी तारापूर तर उशाशी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र येऊन निर्धास्तपणे झोपत आहे याची आपण नोंद घेतली पाहीजे .
देशाच्या आर्थिक विकासाकरीता ,तसेच देशाच्या भावी पिढीला स्वच्छ व स्वस्त वीज मिळण्यासाठी अणुउर्जा प्रकल्पाची असे सवॉच्च न्यायालयाने निष्कर्ष आपण स्विकारले पाहीजेत .
- अँड विलास पाटणे
Comments
Post a Comment