हळदीला असे खुलून दिसले कतरिना कैफ आणि विकी कौशल
मुंबई-
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं ९ डिसेंबर रोजी लग्न झालं. या लग्नाबद्दल कमालिची गुप्तता बाळगण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीही फोटो काढू शकत नव्हते आणि बाहेरील कोणीही आत जाऊ शकत नव्हतं.
फक्त त्या १२० पाहूण्यांना फोर्टमध्ये प्रवेश होता ज्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.त्या पाहूण्यांना अनेक अटी- नियमही पाळावे लागले होते.
पाहूण्यांचा RTPCR अहवाल निगेटिव्ह येणं आवश्यक होतं. तसंच त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक होतं. लग्न स्थळाबाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, जेणेकरून कोणीही छायाचित्रकार आत जाऊ नये.
एवढंच नाही तर आतली लगबग दिसू नये यासाठी किल्ल्याला लांब पडदे लावले होते. तथापि, दीर्घ प्रतीक्षेनंतर, जोडप्याने त्यांच्या इन्स्टा हँडलवर लग्नाचे फोटो शेअर केले. आता दोघांनी लग्नाच्या दोन दिवसांनंतर हळदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
Comments
Post a Comment