रत्नागिरीतील जाकिमी-या अलावा येथील अंगणवाडी शाळेचे बांधकाम करित असताना एका ग्रामस्थाने बांधकामाच्या साहित्याची नासधूस केल्याबाबत ठेकेदार सुरज सावंत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

रत्नागिरी तालुक्यातील जाकिमी-या अलावा येथील अंगणवाडी बांधकामाची नासधूस केल्याबाबत ठेकेदार सुरज सावंत यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली आहे. संदर्भिय विषयानुसार दिनांक ५ नोव्हेंबर २०२१ रोजी जुन्या इमारतीचे बांधकाम निर्लेखन करून मा. टीखे शाखा अभियंता बांधकाम उपविभाग रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार व जागेवर लाइन आऊट दिल्याप्रमाणे काम चालु करण्यात आले. सदरची जागा ही अध्यक्ष जिल्हा परिषदच्या नावे ७/१२ दफ्तरी आहे. तरीही एक ग्रामस्थ हे सदरची जागा माझी स्वतःची असून माझ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र न घेता बांधकाम कसे चालू केले? याबाबत फोनवरून तसेच मि-या ग्रामपंचायत कार्यालयात जावून दमदाटी करत असतात. तरी या बाबी मी त्याला जागा ही जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार सदरचे बांधकाम चालू असलेबाबत समंजसपणे मी व अंगणवाडी सेवीका यांचे समक्ष दिनांक २५-११-२०२१ रोजी समजावून सांगितले व जागेच्या मालकी हक्काबाबत जिल्हा परिषद रत्नागिरी व ग्रामपंचायत मि - या यांच्याशी पत्रव्यवहार करण्यास सुचविले. सदरचे बांधकाम मी स्वतः पावसाच्या व्यत्ययामुळे बंद ठेवले होते. परंतू शाखा अभियंता व अंगणवाडी सेवीका यांच्या आग्रहामुळे दिनाक ३.१२.२०२१ पासून बांधकामाच्या चराची खोदाई व पी.सी.सी चे काम चालू असताना दररोज सदरील ग्रामस्थ व अन्य ३, हे अंगणवाडी येथील चालू असलेल्या बांधकामाच्या ठीकाणी येवून बांधकाम कामगारांना दमदाटी व शिवीगाळ करीत आहेत. दिनांक ८-१२-२०२१ रोजी बांधकामाच्या साहित्याची नासधूस करून बांधकाम कामगारांना मारहाणी करणेबाबत धमकी देवून चालू काम बंद पाडले आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपण स्वतः प्रशासकीय बाबींची पडताळणी करून सदरील त्रास देणारी व्यक्ती वैगरे ३ राहणार जाकी मि-या आलावा, शिवलकरवाडी ता. रत्नागिरी यांनी शासकीय कामात अडथळा आणून माझे मालाची व बांधकाम साहित्याची नासधूस केलेप्रकरणी त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत संबंधीत यंत्रणांना आदेश द्यावेत ही विनंती. तसेच होणा-या बांधकामाच्या दिरंगाई बाबत संबंधीत व्यक्तींवर जबाबदारी निश्चीत करावी व पुढील बांधकामाबाबत मार्गदर्शन आदेश होणेबाबत विनंती. अशा आशयाचे पत्र सडा मी-या रत्नागिरी येथील ग्रामस्थ, ठेकेदार सुरज सावंत यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे.


Comments