राजापूर पाचल मध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाची मोठी कारवाई; मात्र वरिष्ठ प्रशासन अनभिज्ञ कसे?

राजापूर तालुक्यातील पाचल धनगरवाडी येथे अवैध मायनिंग दगड उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून अवैध पाद्धतीने उत्खनन केलेले गौण खनिज भरलेले वाहन ताब्यात घेतल्याची माहीती मिळत आहे. मात्र यासंदर्भात तहसीलदार यांना अद्याप कोणतीच माहीती नाहिये. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडे काही ग्रामस्थांच्या तक्रारी गेल्या. त्यानुसार तलाठी, मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर दगड मटेरियल गौण खनिज ने भरलेले वाहन प्रशासनाने ताब्यात घेतले असल्याची माहीती मिळत आहे. यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली असल्याची माहीती मिळत आहे. अधिकृत माहीती जाणून घेण्यासाठी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतीत अजून कोणतेच रिपोर्टिग माझ्यापर्यंत झालेले नाही अशी माहीती दिली आहे. तसेच राजापूर पोलिस स्थानकाचा फोन कुणीच उचलत नाहित. पोलिस निरिक्षक यांचाही फोन लागला नाही. 
पाचल मध्ये अवैध उत्खननाला पेव फुटले असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईमुळे पाचल तसेच तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात काही लोकप्रतिनिधी देखील मध्यस्ती करत आहेत असेही बोलले जात आहे. सत्य माहीती राजापूरच्या तहसीलदारच देऊ शकतील. तेथील काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारिमध्ये चार ब्रासचाच उल्लेख केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात पंचवीस ब्रास पेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केले असल्याचे बोलले जात आहे. 

Comments