कोकणातील आंबा बागायतदार व शेतक-यांची आमदार डॉ.राजन साळवी व आमदार भरतशेठ गोगावले ह्यांचा पुढाकाराने कृषी मंत्री मा.ना दादा भुसे ह्यांच्या समवेत बैठकीचे संपन्न....

कोकणातील आंबा बागायतदार व शेतक-यांची आमदार डॉ.राजन साळवी व आमदार भरतशेठ गोगावले ह्यांचा पुढाकाराने कृषी मंत्री मा.ना दादा भुसे ह्यांच्या समवेत बैठकीचे संपन्न....


              गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस, चक्रीवादळे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा बागायतदार शेतकरी अतिशय अडचणीत आले असुन कमी उत्पादन व प्रचंड नुकसानमुळे कोकणातील शेतकरी व बागायतदारांनी हिवाळी अधिवशेन दरम्यान मुंबई येथे आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाला आमदार डॉ.राजन साळवी व आमदार भरतशेठ गोगावले ह्यांनी भेट देऊन मा.कृषी मंत्र्यां समवेत बैठकीचे आश्वासन दिले होते.

            त्यानुसार आज सायंकाळी आमदार डॉ.राजन साळवी व आमदार भरतशेठ गोगावले ह्यांनी पुढाकार घेऊन विधिमंडळातील कामकाज संपल्यानंतर कृषी मंत्री मा.ना दादा भुसे ह्यांच्या कार्यालयात कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह बैठक घेऊन आंबा-काजू बागायतदार ह्यांच्या समस्या बाबत मा.मंत्री महोदयांना सविस्तर माहिती देऊन चर्चा केली असतात कोकणातील आंबा-काजू बागायतदार ह्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक मा. पणन मंत्री, मा. ऊर्जा मंत्री व मा. सहकार मंत्री ह्यांची महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री मा.ना अजितदादा पवार ह्यांच्या समवेत बैठक आयोजित करून आंबा-काजू बागायतदार ह्यांच्या प्रश्नांबाबत कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो असे मा.मंत्री महोदयांनी सूचित करून येणाऱ्या वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या बाबत सर्व मंत्री महोदयांची वेळ घेऊन बैठक आयोजन करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदार ह्यांचा प्रश्न आमदार डॉ.राजन साळवी व आमदार भरतशेठ गोगावले ह्यांच्या पुढाकाराने लवकरचं मार्गी लागेल. सदर बैठकीला उपाध्यक्ष प्रकाश साळवी, समृध्द कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव, दीपक राऊत, विचारे, नंदकुमार मोहिते, साळुंके व शेतकरी, बागायतदार उपस्थित होते.

Comments