कोकणच्या विकासाची उंची कोकणातील समुद्राच्या खोलीत दडलेली - मा. आमदार प्रमोद जठार

कोकणच्या विकासाची उंची कोकणातील समुद्राच्या खोलीत दडलेली - मा. आमदार प्रमोद जठार 

भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांची चिपळूण बचाव समितीच्या उपोषणाला भेट

भाजपाचे दोन्ही विरोधी पक्षनेते हिवाळी अधिवेशनात कोकणातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागणी करणार

आज चिपळूण येथे चिपळूण बचाव समितीच्या चालू असलेल्या साखळी उपोषणाला भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मी देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे असे सुरुवातीलाच नमूद केले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे येत्या अधिवेशनात कोकणातील सर्व पूर बाधित नद्यांमधील गाळ काढण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी करणार आहेत असे सांगितले. तसेच राज्य सरकारने दिलेल्या बत्तीसशे कोटी रुपयांच्या पॅकेजमधील मधील एकही रुपया गाळ काढण्यासाठी खर्च होणार नाहीये असे उपोषणकर्त्यांना सांगितले. जठार त्या संदर्भातला जी आर बरोबर घेऊन आले होते त्यांनी तो उपोषणकर्त्यांना पटवून दिला. तसेच केंद्र सरकार च्या माध्यमातून जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची आपण बचाव समितीबरोबर बैठक घेऊन विस्तृत चर्चा करू असे बचाव समितीला सांगितले .त्यासाठी देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, श्रीपाद नाईक यांची मदत घेण्यात येईल. 
बचाव समितीने केलेल्या या उपोषणामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणाला फायदा होणार आहे त्यामुळे या महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल चिपळूण बचाव समितीचे त्यांनी अभिनंदन केले व मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालू ठेवा, वेळ पडल्यास मीसुद्धा मध्येच एखादा दिवस उपोषणाला येईन असे सांगितले. योगायोगाने त्याच वेळेला माजी आमदार रमेश कदम व आमदार शेखर निकम हेही उपोषणस्थळी आले यावेळी प्रमोद जठार यांनी त्यांच्याशी सल्लामसलत करून भाजपातर्फे विधिमंडळात पूर्णपणे यासंदर्भात सहकार्य राहील याची ग्वाही दिली. 
यावेळी शिरीष काटकर, अरुण भोजने, सतीश कदम, किशोर रेडीज ,शहानवाज शहा ,प्रकाश काणे समीर जाणवल कर राजेश वाजे महेंद्र कासेकर आदी उपस्थित होते तर भाजपतर्फे शहराध्यक्ष नगरसेवक आशिष खातू भाजपाचे नगरसेवक निशिकांत भोजने विजय चितळे, नुपुर बाचीम,रसिका देवळेकर,जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, सतीश मोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, महेश कांबळी ,प्रणय वाडकर,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम, अमोल भोबसकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेश ओक ,शहर प्रसिद्धीप्रमुख अमित पाटणकर,आशिष जोगळेकर, शहर सरचिटणीस राम शिंदे,मधुकर निमकर,परेश चितळे आदी उपस्थित होते.

Comments