साखरपा कोंडगाव येथील ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता
देवरुख:
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव येथिल ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी देवरुख पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मेघा महेश राऊत असे बेपत्ता विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत लक्ष्मी गणपत राऊत यांनी फिर्याद दिली आहे. मेघा राऊत या १६ रोजी रात्री ८ वाजता देवाच्या पाया पडून येते असेच सासू लक्ष्मी राऊत यांना सांगून घराबाहेर पडल्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांची सर्वत्र शोध शोध आणि चौकशी करण्यात आली तरी त्यांचा थांगपत्ता न लागल्याने मेघा राउत या बेपत्ता असल्याची फिर्याद लक्ष्मि राऊत यांनी शनिवारी देवरुख पोलीस ठाण्यात दिली आहे. रंग सावळा, उंची ४ फूट, अंगावर शेवाल रंगाची साडी असे मेघा राऊत यांचे वर्णन आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास देवरूख पोलीस ठाणे संपर्क क्रमांक ०२३५४- २६००३३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास देवरुख पोलिस करत आहेत.
Comments
Post a Comment