प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाला आज पासून सुरवात
करोनाच्या साथीचे आव्हान पेलत प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बुधवारपासून बेंगळूरुच्या हॉटेलमध्ये रंगणार असून, याकरिता १२ संघ सज्ज झाले आहेत. हे सामने जैव-सुरक्षा परिघात होणार असून, प्रेक्षकांना ते टेलिव्हिजनवरच पाहता येणार आहेत.
माजी विजेते यू मुंबा आणि बेंगळूरु बुल्स यांच्यातील सामन्यात आठव्या हंगामाला प्रारंभ होईल. त्यानंतर तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायव्हाज या दाक्षिणात्य संघांमधील झुंज रंगेल, तर तिसरा सामना गतविजेते बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात होईल. यंदाच्या प्रो कबड्डीत चाहत्यांना तिहेरी सामन्यांची लज्जतसुद्धा अनुभवता येणार आहे. हंगामाच्या प्रारंभीचे चार दिवस व त्यानंतर प्रत्येक शनिवारी तीन सामने होणार आहेत.
हे सामने स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी, फर्स्ट आणि हॉटस्टार वर पाहता येणार आहेत.
Comments
Post a Comment