रत्नागिरी पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रत्नागिरी चे यश
रत्नागिरी :
कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशन आणि लिफ्टर्स जिम कळंबा आयोजित महाराष्ट्र राज्य असोसिएशन च्या
मान्यतेने दि. ११ ते १२ डिसेंबर २०२१ रोजी राज्यस्तरीय सीनिअर पॉवरलिफ्टींग इक्विप्ड (महिला व पुरूष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील फिनिक्स महिला नगरपरिषद जिम आणि NSG (एन.एस.जी.) फिटनेस जिम चिपळूण मधील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील
विविध जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील धनश्री महाडिक हिने ५७ किलो वजनी गटात २८० किलो वजन उचलून चांगली कामगिरी केली. ऐश्वर्या दुधाळ हिने ६९ किलो वजनी गटात एकूण २४२.५ किलो वजन उचलून ६वा क्रमांक पटकावला.श्रद्धा पाडाळकर हिने ७६ किलो वजनी गटात १७० किलो वजन उचलून चांगली कामगिरी केली. ८४ किलो वजनी गटात प्रतिक्षा साळवी ने एकूण ४९७.५ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले.
तसेच सीनिअर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी प्रतिक्षा साळवी हीची निवड झाली आहे. रुपेश उदेग याने ६६ किलो वजनी गटात ४०७.५ किलो वजन उचलून उत्तम कामगिरी केली. या सर्व खेळाडूंचे
रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment