नारायण राणेंच्या बंगल्यावर कायदेशीर खलबतांना वेग;नितेश राणेंना अटक कीजामीन?
सिंधुदुर्ग :
संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी
न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर मंगळवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी नारायण राणे यांच्या बंगल्यावर गुप्त खलबते सुरु आहेत.
काही वेळापूर्वीच नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि राजू परुळेकर राणे यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. याठिकाणी नितेश राणे यांच्यासमोरील कायदेशीर पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता
आहे. त्यामुळे आता न्यायालयात नितेश राणे यांच्या वकिलांकडून काय युक्तिवाद केला जाणार, हे पाहावे लागेल.संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली पोलिसांच्या कारवाईला सध्या प्रचंड वेग आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक
करण्यात आली आहे. यापैकी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यानंतर आता या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप असणारे
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तविली जातआहे.त्यामुळे नारायण राणे नागपूरातील दौरा अर्धवट सोडून गोव्यात परतले होते. त्यानंतर गोवा विमानतळावर नारायण आणि नितेश राणे
यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल दिवसभर त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची
चर्चा सुरु होती. या सगळ्या घडामोडींमुळे सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांच्यातर्फे वकिलांची फौज न्यायालयात उभी राहणार आहे. अॅडव्होकेट संग्राम देसाई नितेश राणे
यांच्यासाठी युक्तिवाद करतील. तर अॅडव्होकेट राजेंद्र रावराणे, राजेश
परुळेकर आणि उमेश सावंत हे वकील त्यांच्या सहकार्यासाठी उपलब्ध असतील. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट प्रदीप घरत आणि अॅडव्होकेट भूषण साळवी युक्तिवाद
करतील. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी २.४५ वाजता या जामीन अर्जावर सुनावणी होईल.
Comments
Post a Comment