आंदोलनात सहभागी झालेल्यांचा बदल्या, बडतर्फी, निलंबन मागे घ्या,एसटी कर्मचार्यांची मागणी

आंदोलनात सहभागी झालेल्यांचा बदल्या, बडतर्फी, निलंबन मागे घ्या,एसटी कर्मचार्यांची मागणी 

गेले ३५ दिवस काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कामगारांनी काल जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर केले. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या, बडतर्फी, निलंबन मागे घेण्यासंदर्भात या निवेदनात मागणी केली आहे. रत्नागिरी आगारातील कर्मचार्यांनी हे निवेदन दिले.
रत्नागिरी आगारातील सहकारी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण असो व कामगारांना मोटार वाहतूक कामगार अधिनियम १९६१ चे तरतुदीचा भंग प्रशासनाने ड्युटी करायला लावल्यानंतर घडलेल्या प्रवासी वा त्रयस्थ जनतेच्या मरणांतक वातावरणात भीतीच्या वातावरणात जगत आहेत. त्या मानसिग दबाव व दुखवट्यात असतानाही कोणतीही चौकशी न करता आणि त्यावर उपाय न करता विभाग नियंत्रकांनी बेकायदेशीर बदल्या केल्या आहेत. 

Comments