नाणीज येथे पैशांच्या वादातून मारहाण!
रत्नागिरी :
तालुक्यातील नाणीज येथील सरोदेवाडी येथे भूसंपादनातील पैशांच्या वादातून एकास हाताने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवार, दि. १०
डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. सुमारास घडली. रुपेश चंद्रकांत केतकर आणि यशोदा यशवंत केतकर (दोन्ही रा. नाणीज सरोदेवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे
आहेत. त्यांच्याविरोधात विनायक रोहिदास मराठे (३२,रा. नाणीज सरोदेवाडी, रत्नागिरी) यांनी शनिवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून,रस्त्याकरिता भूसंपादन झालेल्या पैशातून त्यांच्यात वाद होते. यातूनच शुक्रवारी दुपारी रुपेश आणि यशोदा केतकर या दोघांनी विनायक
मराठेला शिवीगाळ तसेच दमदाटी करत हातांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस
हवालदार कांबळे करत आहेत.
Comments
Post a Comment