राजापूरातील अणसुरे गावात पंचायत समिती सभापती सौ.करुणा कदम यांच्या उपस्थितीत आत्मा अभियानांतर्गत आंबा मोहोर संरक्षण या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत आज दिनांक 22/12/2021 रोजी आडभराडे केंद्र शाळा अणसुरे येथे सकाळी 11:00 वाजता जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण - आंबा मोहोर संरक्षण या विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पंचायत समिती सभापती सौ.करुणा कदम असुन पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष सौ.शुभांगी डबरे, ग्रामपंचायत सरपंच अणसुरे रामचंद्र कणेरी, ग्रामपंचायत उपसरपंच सौ.प्रांजली गावकर, तालुका कृषी अधिकारी श्रीम.विद्या पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्रीम.शीतल घार्गे, माजी सभापती कमलाकर कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य व अणसुरे सोसायटीचे चेअरमन विनोद गावकर तसेच प्रगतशील शेतकरी बागायतदार प्रकाश गावकर, रमेश सावंत, शिवाजी मयेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र लांजा विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र) श्री.चव्हाण सर तसेच कोरोमंडल इंटर नेशनल ली.चे झोनल सेल्स मॅनेजर-पुणे श्री.प्रसाद पारेख यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. यावेळी कोरोमंडल इंटर नॅशनल ली.रिजनल बिझनेस हेड महाराष्ट्र डिवीजन श्री.उमेश कदम,सिनियर मार्केटिंग ऑफिसर श्री.प्रविण बिरादार उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये आंबा मोहोर संरक्षण, जमिनीचे आरोग्य, खत व्यवस्थापन, किड-रोग व्यवस्थापन, संजीवकाचा(कल्टार) सुयोग्य वापर तसेच फवरणी करते वेळी घ्यावयाची काळजी यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) - वैभव अमरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कृषी सहाय्यक श्रीम.मंगला डांगमोडेकर ,कृषी सहाय्यक श्री. उत्तम पाटील व कृषी सहाय्यक श्रीम.करिष्मा नदाफ यांनी विशेष श्रम घेतले असून तालुक्यातील कृषी सहाय्यक श्री.सोनवणे,श्री.महाले व ग्रामसेवक श्री.राऊत इत्यादी कर्मचारी उपस्थिती होते.
प्रशिक्षणाला गावातील शेतकरी बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Comments
Post a Comment