दोडामार्ग तालुका निर्मिती आपणच केली ; आता शहरांचा कायापालटही आम्हीच करू !


जनतेचा कौल भाजपलाच असेल ; ना. नारायणराव राणे यांचा शहरवासीयांवर विश्वास

दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातील जी प्रलंबित विकास कामे आहेत ती मार्गी लावण्यासाठी आपण केंद्राकडून भरघोस निधी देऊ. तालुका निर्मिती बरोबरच कार्यालयेही केली. शहराचा कायापालटही आम्हीच करू! रोजगारासाठी आडाळी एमआयडीसी आणली त्याठिकाणी आयुर्वेदिक संशोधन केंद्राला मंजुरी घेतली. एमआयडीसी पासून अवघ्या अंतरावरच मोपा विमानतळ होत आहे. त्यामुळे येथे उद्योगांना वाव मिळणार आहे. एकदाका उदयोगधंदे सुरू झाले. तर , भविष्यात दोडामार्ग शहर विकसित होऊन कायापालट होणार आहे . हे आम्हीं करून दाखवू ! शहरातील जनता यापूर्वी माझ्या पाठीशी राहिली आहे. मला खात्री आहे.दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपचीच सत्ता बसविण्यासाठी जनता कौल देईल हे निश्चित आहे .त्याच बरोबर जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही भाजपच विजयी होणार असल्याचे केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांनी दोडामार्ग येथे बोलताना विश्वास व्यक्त केला.
दोडामार्ग शहरातील भाजपा उमेदवार व पदाधिकारी यांच्याशी त्यानी आज महालक्ष्मी हॉल मध्ये संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार जिल्हाध्यक्ष राजन तेली उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर तालुका अध्यक्ष प्रवीण गवस शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर मंदार कल्याणकर आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव चेतन चव्हाण संतोष नानचेआदी उपस्थित होते
यावेळी मार्गदशन करताना ना राणे यांनी नवीन उमेदवार यांना काम करताना सर्व सामान्य जनतेला अभिप्रेत काम केले पाहिजे त्याच्याशी सौजन्याने वागले पाहिजे त्याना नमस्कार केला पाहिजे जेष्ट नागरिकांना वाकून नमस्कार करा त्याचे आशीर्वाद घ्या तुम्हाला मिळालेल्या संधीचे भाजपा उमेदवार यांनी निवडून केले पाहिजे शहरातील नागरी सुविधा देण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करा भाजपच्या वतीने रस्ते पाणी वीज आदी सह वाचनालय ही उभी करण्यात येतील शहराच्या विकासासाठी निधी दिला जाईल असे आश्वासन ना राणे यांनी दिले यावेळी उमेदवार यांनी दोन दिवस परिश्रम घेऊन निवडून येण्यासाठी जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचे आवाहन केले यावेळी त्यानी भविष्यात रोजगार निर्मिती साठी लवकरच आडाळी संशोधन केंद्राचे भूमिपूजन करण्यात येणार आहे स्थानिकांना आडाळी एमआयडीसीत लवकरच भूखंड देण्यात येतील प्रलंबित कामे ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले यावेळी माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले की जिल्हयातील दोन आमदार असताना पालकमंत्री रत्नागिरीचा असून जिल्हयाचा पाहुणा आहे पाहुणा हा कायमस्वरूपी राहत नाही येतो जातो त्यामुळे येथील स्थानिक आमदार पालकमंत्री पाहिजे याच्यावर विश्वास नसल्याने विकास काय करणार असा खोचक सवाल उपस्थित केला यावेळी त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना निवडून आणण्याचे आवाहन केले तर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर हे निवडणूक आली की वेगवेगळ्या घोषणा करतात रस्ता दुरुस्ती साठी कोट्यवधी निधी दिला सेटटॉप बॉक्स एक लाख लोकांना देणार चष्मा कारखाना आता तिलारी अमेझॉन पार्क अशा विविध घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या नाही आता नगरपंचायत निवडणूकित त्याना त्याची जागा 13 जागा भाजपच्या जिकून दाखवून द्या असे आवाहन कार्यकत्याना केले यावेळी एकनाथ नाडकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर आभार राजेंद्र म्हापसेकर यांनी मानले.

Comments