राजापूर येथील निलंबित एसटी कर्मचाऱ्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
राजापूरः-
एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राकेश रमेश बांते (वय ३५) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना,बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
राजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांकडुन मिळाली. त्यामध्ये गेली
चार वर्षे चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश बांते यांचा देखील समावेश होता. डिसेंबर महिन्याच्या
दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तणावाखाली होते अशी माहिती
एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान अत्यावस्थ वाटु लागल्याने काल, बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालविली.
मयत राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील असून, गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. ते पत्नी व चार वर्षे एक व सव्वा वर्ष अशा दोन मुलांसह राजापुरात रहात होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरु होते भंडारा येथील
त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनिकरण करावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा
संप सुरु आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही
कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हावे यासाठी आवाहन
करण्यात येत आहे. इतकेच नाही तर कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबण्याची कारवाई रद्द करण्यात
येईल असेही सरकारने जाहीर केले आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनिकरण करावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु
आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारकडून
वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे. इतकेच नाही तर कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबण्याची कारवाई रद्द करण्यात येईल असेही सरकारने जाहीर केले आहे.
सरकारच्या या आवाहनाला काही कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला. यानंतर एसटी सेवा
काही प्रमाणात सुरळीत सुरु झाली. यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment