हेलिकॉप्टर अपघातातील ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचा मृत्यू
तामिळनाडूच्या कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमधील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचे आज बुधवारी निधन झाले. वरूण सिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगळुरू येथे उपचार सुरू होते.
अल्पावधीतच त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांना एअरलिफ्ट करून बंगळुरू येथे आणण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांच्याकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरूण सिंह हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यासोबतचे सीडीएस बिपीन रावत आणखी १३ जणांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले होते. वरूण सिंह यांची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती जाहीर केली आहे. बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Comments
Post a Comment