सेन्सेक्स’ची १,०१६ अंशांनी झेप

सेन्सेक्स’ची १,०१६ अंशांनी झेप

मुंबई-
अल्पकालीन अनिश्चितता लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवल्याचे आणि ओमायक्रॉनबाबतची चिंता कमी झाल्याचे बुधवारी भांडवली बाजारात स्वागतपर पडसाद उमटले. परिणामी सलग दुसऱ्या सत्रात तेजीचा प्रवाह कायम राखत ‘सेन्सेक्स’ १०१६ अंशांनी उसळला. 

करोनाचा नवीन उत्परिवर्तित अवतार असलेल्या ओमायक्रॉनची परिणामकारकता सौम्य असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीतीही टळली आहे. त्यातच कर्जे स्वस्त राखून, रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेच्या वाढीला पूरक टाकलेल्या पावलाने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०१६.०३ अंशांनी वधारून ५८,६४९.६८ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २९३.०५ अंशांची कमाई केली आणि तो १७,४६९.७५ पातळीवर स्थिरावला.

Comments