राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप आरेकर यांच्या हस्ते, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्या उपस्थितीत अंगणवाडी व प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

15 वा वित्त आयोग सन 2020/2021 या अभियानाच्या 10 टक्के शिक्षण व 10 टक्के महिला व बालकल्याण योजनेमधून शिवणे खुर्द अंगणवाडी शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी शिवणे खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच दिलिप शांताराम आरेकर व उपसरपंच प्रतिक्षा नरेश पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ.सुमन प्रशांत घाणेकर, सौ.संजना संदिप बोळे, सौ.तन्वी शशिकांत गार्डी, गणेश शांताराम गोठणकर, ग्रामसेवक प्रशांत डिगूळे, शाळेचे मुख्याध्यापक जड्यार, शिक्षक श्री पाटील व वाघमारे आदी उपस्थित होते.

Comments