इस्तांबूल तुर्की येथे झालेल्या पॉवरलिफ्टिंग अँड बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या संपदा नागवेकरला मिळाले सुवर्ण पदक; समस्त कोकणवासियांकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

सिद्धेश मराठे/ रत्नागिरी प्रतिनिधी:-
इस्तांबूल तुर्की येथे २०२१ ओपन, सब ज्युनियर, ज्युनियर अँड मास्टर्स एशियन क्लासिक अँड इक्वीप्ड पॉवरलिफ्टिंग अँड बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मूळची रत्नागिरीतील सोमेश्वर येथील सध्या राहणार मुंबई येथील संपदा सतेंद्र नागवेकर हिने ६३ किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले आहे. अभ्यास आणि खेळ दोन्हींचा समन्वय साधत तेवढ्याच तन्मयतेने, चिकाटीने, सततच्या सरावाने तीला हे यश प्राप्त झाले आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीप आवारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कोल्हापूर येथे झालेल्या सिनियर राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक प्राप्त झाले होते. २५ डिसेंबर २०२१ रोजी तुर्की इस्तांबूल येथे आयोजीत स्पर्धेत संपदा सतेंद्र नागवेकर सुवर्ण पदकाची मानकरी झाली. फिनिक्स पक्षाची जशी झेप असते, धाडस, जिद्द आणि कर्तुत्व, संकटांना चिरडून टाकून संपदा सतेंद्र नागवेकर हिने मोठे यश प्राप्त केले आहे. संपदा सतेंद्र नागवेकर हिच्या यायशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments