फार्स मिऱ्या धुपप्रतीबंधक बंधाऱ्याच्या उद्घाटनाचा
फार्स मिऱ्या धुपप्रतीबंधक बंधाऱ्याच्या उद्घाटनाचा २६-१२-२०२१ रोजी दुपारी ३ वाजता सदर कामाचे भूमिपूजन पत्रिकेत दर्शविल्याप्रमाणे मान्यवरांच्या उपसथितीत संपन्न होणार असल्याचे समजते. मुळात या कामाचे श्रेय भूमिपुत्र माजी. आमदार श्री. बाळासाहेब माने यांचे.
वेळोवेळी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच त्या वेळचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व त्या वेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी दी. ६ मार्च २०१९ रोजी (१८९,६७,०६२०० ) एकशे एकोणनव्वद कोटी सदुसष्ट लाख सहा हजार दोनशे रुपये किंमतीच्या अंदाजात खर्चाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यत मिळवून
दिली. त्यामुळे मिर्यावासीय म्हणून मी त्यांचे आभार मानतो . सदरचा कार्यक्रम हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरटेंबे) येशील लोकांच्या गरज असलेल्या बंधाऱ्याचा आहे .
त्यासाठी स्थानिक लोकांनी वेळोवेळी संघर्ष देखील केला आहे . यासाठी
२३ लोकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत हे देखील नाकारून चालणार नाही . लोकांवर दाखल असणारे गुन्हे जर मागे घेता आले तर लोकांना होणारा त्रास वाचेल . राहिला विषय कामाच्या भूमिपूजनाचा तर त्यासाठी एवढा गाजावाजा करून भूमिपूजन करणे आवश्यक आहे का ? बऱ्याच अंती पांढरा समुद्र येथे समुद्राचे पाणी ज्या कारणाने लोक वस्तीत घुसते त्याच मुख्य कारण म्हणजे वाळू चोरी आणि त्या वाळू चोराने सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहताना जनाची नाहीतर मनाची तरी लाज
बाळगावी .
जर करायचचचं असेल तर गावातील भारती शिपयार्ड कंपनी अनेक वर्ष बंद स्थितीत आहे त्यामुळे गावाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे त्यामुळे लोक देशोधडीला लागले आहेत लागले आहेत हे देखील नाकारून चालणार नाही . आणि कंपनी सुरू हेण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिसून येत नाही आहेत . याआधी आपल्या गावाचे मा. माजी कृषी मंत्री पी.के. सावंत यांच्या स्मारकाचे उद्घाटन देखील मोठ्या थाटामाटात झाले होते आज १२ वर्ष झाली तरी काम पूर्ण तत्वास गेले नाही ही शोकांतिका आहे . कामाच्या उद्घाटनासाठी गावातील स्वयंघोषित नेते २०००/३००० लोकं जमवणार अश्या वल्गना करत आहेत . गावातील लोक जमणार असतील तर आनंदच आहे पण गावाबाहेरील लोकं जर गावात येणार असतील आणि सध्या थैमान घालत असणारा विषाणू ओमिक्रोन ( कोविड ) बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे पसरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही . त्यामुळे एवढी गर्दी जमवणे आवश्यक आहे का ? आणि एवढी लोकं जमल्यानंतर आरोग्य संबंधित कोणतेही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार ?
मा. मुख्यमंत्री ठिकठिकाणी कामाची उद्घाटने ऑनलाईन पद्धतीने करत आहेत . तर या कामाचा देखील अश्या प्रकारे उद्धघाटन चालू शकले असते आणि जो काय बडेजाव करायचा होता तो मग काम पूर्ण झाल्यावरही करता आला असता .
भैया भाटकर
ग्रामपंचायत मिऱ्या
माजी उपसरपंच
Comments
Post a Comment