मंत्री उदय सामंत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना गोळप विभाग पुरस्कृत गोळप चॅम्पियन ट्रॉफी २०२१-२२ ह्या भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना गोळप विभाग पुरस्कृत गोळप चॅम्पियन ट्रॉफी २०२१-२२ ह्या भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, उप नगराध्यक्ष रोशन फाळके, उपजिल्हाप्रमुख व जि.प. सदस्य बाबू म्हाप, उपशहरप्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण, विभागप्रमुख नंदा मुरकर, विभागप्रमुख मनोज साळवी, विभाग संघटक विठ्ठल पावसकर, बंधू वारिसे, प्रशांत जांगळी, महेश भाटकर, उपसरपंच जिगरमिया पावसकर, जिक्रिया पावसकर, संदीप तोडणकर, मन्सूर हातोडकर, नजीम मुल्ला, राजेश पावसकर, नेताजी पाटील ह्यांच्यासह गोळप विभागातील सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment