गणेशगुळे गावात होतेय अवैध वाळू उत्खनन, लेखी पत्र देऊनही कार्यवाही नाही, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील कार्यवाहीचे आदेश देतील काय?

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगूळे गावात अवैध वाळू उत्खनन होत आहे. याबाबत रत्नागिरी महसूल विभागाला वारंवार लेखी पत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा दावा तेथील ग्रामपंचायतीने केला आहे. मागिल काही वर्षांपासून गणेशगूळे गावात अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. अवैध वाळूची वाहतूकही अवैधच ठरू शकते. राजापूर ते पावस व पावस ते रत्नागिरी या दरम्यानच्या सागरी महार्गावर पोलिस प्रशासनाचे पेट्रोलिंग कधी सुरु असते. पेट्रोलिंग सुरु असेल तर मग अवैध वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर पोलिस कारवाई का करत नाहित. खरेच अवैध वाळू उत्खनन व अवैध वाळू वाहतूक होत आहे का? गणेशगुळे ग्रामपंचायतीने दिलेली लेखी तक्रारीची दखल अद्याप पर्यंत का घेतली गेली नाही?, नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील नेमकी काय भूमिका घेणार असे असंख्य सवाल उपस्थित केले जात आहेत. 

Comments