'इंधन अपहारप्रकरणी खेडचेनगराध्यक्ष वैभव खेडेकरयांच्यावर गुन्हा दाखल करा'


खेड :
खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात इंधन अपहारप्रकरणी राज्य शासनाने ठपका ठेवून फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश प्रशासनाला देऊनही प्रशासनाकडून गुन्हा
दाखल करण्यात वेळकाढूपणा होत असल्याने या धोरणाच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण
करणार आहेत, अशी माहिती शहर प्रमुख निकेतन पाटणे यांनी दिली आहे.

या बाबत माहिती देताना श्री. पाटणे म्हणाले की, डिझेल घोटाळा प्रकरणी दोन महिन्यांपूर्वीच नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात गन्हा दाखल करण्याबाबत शासनाने आदेश प्रशासनाला दिले होते.
मात्र, प्रशासनाकडून चालढकलपणा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शुक्रवारी दि. २४ रोजी खेड तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपोषण करून या विषयाकडे
लक्ष वेधणार असल्याचे श्री. पाटणे यांनी सांगितले.

Comments