रत्नागिरीतील कोतवडे - सडये रस्त्या संदर्भात कोतवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर

रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे मार्गावरील कोतवडे - सडये रस्त्याच्या कामा संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे व कोतवडे ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रत्नागिरी कोतवडे या मार्गावरील कोतवडे सडये ह्या रस्त्याची खूपच दुरावस्था होती. पावसाळ्यात तर मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे खूपच जिकरीचे झाले होते. ग्रामपंचायत कोतवडे मार्फत वेळोवेळी संबंधित खात्याला पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता. सध्या या रस्त्याचे काम धिम्या गतीने चालू आहे. कोतवडे ग्रामपंचायत हद्दीत साधारण एक ते दीड किलोमीटर चे बी बी एम चे काम झाले असून 200 ते 225 मीटर बी बी एम चे काम शिल्लक राहिले आहे. त्याच बरोबर सम्पूर्ण रस्त्यावर कार्पेट व सिलकोट मारणे अत्यावश्यक आहे. त्या बाबत ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे व कोतवडे ग्रामस्थ यांनी गुरुवार दिनांक 30 डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी, यांच्याकडे सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पड्याळ, सदस्या श्रीमती ज्योती मयेकर, सदस्या पायल पांचाळ, माजी उपसरपंच स्वप्नील मयेकर  तसेच कोतवडे येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. कोतवडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या च्या अखत्यारीत असणाऱ्या मोऱ्या व गटारांची दुरूस्ती देखील तातडीने झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकारी अभियंता श्रीम.पुजारी यांनी येत्या दोन दिवसात रस्ताचे रखडलेले काम सुरू करू असे ग्रामपंचायत व ग्रामस्थांना आश्वाशन दिले.

Comments