प्रमोद जठार यांच्या १० पिढ्या गेल्या तरी नाणारला रिफायनरी होऊ देणार नाही. काय तडफडायचे तेवढं तडफडा -खासदार विनायक राऊत

प्रमोद जठार यांच्या १० पिढ्या गेल्या तरी नाणारला रिफायनरी होऊ देणार नाही. काय तडफडायचे तेवढं तडफडा -खासदार विनायक राऊत 

जिल्ह्यातील देवगड- जामसंडे नगर पंचायतच्या शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी संदर्भात भाष्य केलं आहे. या नाणार रिफायनरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील तीन गावांचे भूसंपादन केलं जाणार होत. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत प्रचार सभेच्या व्यासपीठावरून नाणार रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत होणार नसल्याचे स्पष्ट केलं. यावेळी भाजपचे नेते प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली आहे. प्रमोद जठाराना झोप लागत नसेल, जोपर्यंत रिफायनरी हा शब्द डोक्यातून जात नाही, तोपर्यत प्रमोद जठाराना झोप येणार नाही. रिफायनरीच्या नावाखाली जी जमीन हडप केली. त्या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी आसुसलेले प्रमोद जठार यांच्या १० पिढ्या गेल्या तरी नाणारला रिफायनरी होऊ देणार नाही. काय तडफडायचे तेवढं तडफडा. असलेले नसलेले सगळे नारळ फोडा मला काही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.

तुमची दलाली गेल्याचे मला दुःख नाही. लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. प्रमोद जठार म्हणजे दलालीतील नंबर एक माणूस, नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय दुटप्पी भूमिका घेणारे आधी नाणारला विरोध आणि आता भाजप मध्ये गेल्यानंतर लोटांगण घातलं. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आगंण म्हणून राणेंना दिल नाही, असेही राऊत म्हणाले.

Comments