रत्नागिरीत ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रभावीपणे पुढे नेणारे पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात येणार आहे. प्रख्यात इतिहास संशोधक प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील हे शिवचरित्र या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी, शिवप्रेमी नागरिकांबरोबरच वाचक, इतिहास अभ्यासक, संशोधक, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment