वीरशैव लिंगायत समाज मर्यादित कोकण विभागीय क्रिकेट सामने
*वीरशैव लिंगायत नवनिर्माण युवामंच*
रत्नागिरी जिल्हा आयोजित
भव्य क्रीडा व सामाजिक उपक्रम संपन्न
दि. 10 11 व 12 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल रत्नागिरी येथे भव्य दिव्य असा क्रीडा व सामाजिक उपक्रम संपन्न झाला. या मध्ये *मोफत कोरोना लसीकरण कोरोना योद्धांचा सन्मान व महिला पुरुषांचे क्रिकेट सामने* आयोजित केले यामध्ये पुरुषांचे 20 संघ तर महिलांचे 4 संघ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दि.10 रोजी *रायपाटण मठाचे मठाध्यक्ष रविशंकर शिवाचार्य महाराज* यांच्या हस्थे करण्यात आले तर कार्यक्रमाची सांगता व बक्षीस वितरण रत्नागिरी जिह्यातील *माजी आमदार बाळसाहेब माने* यांच्या उपस्थितीत दि.12 रोजी संपन्न झाला
या स्पर्धे मध्ये *साई 11 राजापूर संघ हा विजेता संघ ठरला(संघ मालक- साईप्रसाद महादेव लिंगायत)तर नवनिर्माण युवामंच रत्नागिरी हा संघ उपविजेता ठरला.*
महिलांमध्ये *राजमाता जिजाऊ मुंबई हा संघ विजेता तर शिवकन्या रत्नागिरी हा संघ उपविजेता* ठरला
पुरुषांच्या सामान्या मध्ये सागर गुरव हा उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर ठरला तर ओंकार लिंगायत दिनू हा उत्कृष्ट गोलंदाज व अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमित लिंगायत ठरला. महिलांमध्ये प्राजक्ता लिंगायत ही मालिकावीर व उत्कृष्ट महिला फलंदाज ठरली तर प्रणाली गुरव ही उत्कृष्ट महिला गोलंदाज ठरली.
सामाजिक उपक्रम म्हणून या स्पर्धे *दरम्यान 50 लोकांचे लसीकरण करण्यात आले तर 30 लोकांना कोरोना योद्धा* म्हणून सन्मानित करण्यात आलं.
संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण साईप्रसाद लिंगायत SSR live व टेनिस क्रिकेट live या Youtube चॅनेल द्वारे दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व आयोजन केल्याबद्दल वीरशैव नवनिर्माण युवामंच चे सर्व सदस्य
Comments
Post a Comment