पंतपरधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक; 'ही' मागणी करत केले असंख्य ट्विट, यंत्रणांची झोप उडवली

नवी दिल्ली : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर हँडल हॅक करण्यात आल्यानंतर शनिवारी मध्यरात्री एकच खळबळ उडाली होती. क्रिप्टो करन्सी ला कायदेशीर मान्यता द्यावी, या मागणीसाठी हॅकर्सने ही आगळीक केल्याने आज भल्या पहाटे सरकारी यंत्रणांची झोप उडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर हॅण्डल पूर्ववत करण्यात आले असून यातून हॅकर्स नी केलेली ट्विट अधिकृत नाहीत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील महिनभरापासून केंद्र सरकार आभासी चलनांच्या धोरणाबाबत चर्चा करत आहेत. देशात बितकॉईन आणि इतर आभासी चलनांच्या कायदेशीर मान्यतेबाबत आजही संदिग्धता कायम आहे. अशातच शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक हॅण्डल वरून आभसी चलनांच्या कायदेशीर मान्यतेबाबत एकामागून एक ट्विट करण्यात आली होती. मात्र या अचानक झालेल्या ट्विट मुळे सरकारी यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. पंतप्रधनांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर ते पूर्ववत करण्यात आल्याचं सरकारने म्हटले आहे.

Comments