वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी साडेसात कोटी- उपमुख्यमंत्री

चिपळूण
वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणवासीयांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही आपल्याला आमदारकीची चिंता नसल्याचे सांगून संघर्षाचा इशारा दिला होता. याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाळ काढण्यासाठी साडेसात कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिले.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निधीस मंजुरी देण्याची हमी उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आमदार शेखर निकम व जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत गाळ काढण्यास सुरवात करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. आमदार शेखर निकम यांनी पहिल्या दिवशी या उपोषणस्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दिला होता. दुसऱ्याच दिवशी ते मुंबईत पोहोचले. जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार निकम यांनी भेट घेतली.

Comments