रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांनी मेंबर व्हेरिफिकेशन करून घेण्याबाबत प्रशासनाच्या सूचना

रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांनी मेंबर व्हेरिफिकेशन करून घेणेचे आहेत. तरी रत्नागिरी तालुक्यातील सर्व रेशनकार्डधारकांनी मेंबर व्हेरिफिकेशन 31 डिसेंबर 2021 पर्यंत करुन घ्यावे.रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधारकार्ड घेवून रास्तभाव दुकानात जावून ई-पॉस मशीनवर अंगठा देवून व्हेरिफिकेशन करावयाचे आहे. जी व्यक्ती कामानिमित्त बाहेर असेल वा मुंबईत असेल तर त्यांनी जवळच्या रास्तभाव दुकानात जावून ई पॉस मशीनवर अंगठा देवून व्हेरिफिकेशन करू शकतात. जे लाभार्थी व्हेरिफिकेशन करणार नाहीत ते रेशनधारक शासनाकडून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे रेशनकार्ड मेंबर व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन तहसिलदार रत्नागिरी शशिकांत जाधव, यांनी केले आहे.

Comments