नाटे पंचक्रोशी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याला मुकली

राजापूर तालुक्यातील नाटे गावातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व कै. दत्ताराम शंकर साळवी यांचे दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दत्ताराम साळवी हे नवलादेवी देवस्थान ट्रस्ट चे खजिनदार होते तसेच ते नवलादेवी मंदिरात गुरव म्हणून जबाबदारी सांभाळत होते. ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी ग्रामपंचायत नाटे मध्ये ५ वर्ष उपसरपंच पद भूषविले होते तर त्यानंतर ५ वर्ष सरपंच पद ही भूषविले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध माध्यमातून प्रयत्न तर केलेच परंतु अनेक गरीब गरजू लोकांना सहकार्य ही केलं. नाटे पंचक्रोशीतील शेकडो लोक त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहेच परंतु संपूर्ण नाटे पंचक्रोशी मध्ये एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Comments