नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत राजापूर शहरातील खंडेपार येथील गणेश घाटाच्या बांधकामाचा शुभारंभ

रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर शहरातील खंडेपार येथील गणेश घाटाच्या बांधकामाचा शुभारंभ शनिवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या गणेश घाटासाठी सुमारे 12 लाख 55 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील ओगलेवाडी, दिवटेवाडी, गुजराळी या भागासह शहरालगतच्या चापडेवाडी परिसरातील श्री गणेश मुर्तींचे या ठिकाणी विसर्जन होत असते. या ठिकाणी सुसज्ज असा विसर्जन घाट असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. शुभारंभ प्रसंगी नागरिकांच्या सुचने नुसार जनभावना विचारात घेऊन सदर काम पूर्ण करावे असा सूचना मक्तेदारना नगराध्यक्ष यांनी दिल्या.
या भूमीपुजन समारंभाला उपनगराध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेना गटनेता विनय गुरव, नगरसेवक संजय ओगले, सौ.मनिषा मराठे, स्वाती बोटले, पतिक्षा खडपे, शुभांगी सोलगावकर, शिवसेना शहरपमुख संजय पवार, भाई पवार, सुभाष पवार, संजय दुधवडकर, प्रकाश आमकर, नाना कुवेस्कर, श्रीकांत ताम्हणकर, सुशांत मराठे, राजू रानडे, दशरथ दुधवडकर, कैलास कोठारकर, राजू दिवटे, श्रृती ताम्हणकर, श्री.नलावडे आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments