जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णकन्या स्वरा साखळकर ठरली बेस्ट फायटर चषकाची मानकरी

रत्नागिरी : जिल्हास्तरीय 19वी सब ज्युनियर, 7वी कॅडेट व 8 वी ज्युनियर तायकांदो क्युरोगी व पूमसे अजिंक्यपद स्पर्धा 24 आणि 25 डिसेंबर रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातून जवळपास 350 स्पर्धकांनी आपला सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवला होता. युवा मार्शल आर्ट अकॅडमी ची Red 1 स्पर्धक कुमारी स्वरा विकास साखळकर हिने सब ज्युनियर under 29 गटात विशेष ठसा या स्पर्धेमध्ये उमटवला

फ्री स्टाईल पुमसे ( वैयक्तिक )प्रकारात स्वरा हिने सुवर्णपदकाला गवसणी घालून सुरुवातच दिमाखात केली यानंतर उत्कंठा वाढून राहिलेल्या क्युरोगी ( फाईट ) प्रकारात स्वरा हिने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आपली घोडदौड चालू ठेवली होती सुरुवातीच्या तीन लढती जिंकून स्वराने दणक्यात अंतिम फेरीत धडक मारली होती अंतिम फेरीत समोर ब्लॅक बेल्ट स्पर्धक असतानाही स्वराने ही लढत एकहाती जिंकून पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. क्यूरोगी प्रकारात दाखवलेला आक्रमकपणा आणि मिळवलेले सुवर्णपदक या दुहेरी संगमामुळे स्वरा हिला स्पर्धेतील जिल्हास्तरीय बेस्ट फायटर चषक मिळाला आहे
 
युवा मार्शल आर्ट अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक श्री राम करा सर, तसेच सहाय्यक प्रशिक्षक श्री तेजस सर, अमित सर, गौरव सर, यांचे विशेष मार्गदर्शन स्वरा हिला मिळाले. स्वरा साखळकर ही इयत्ता तिसरी मध्ये शिकत असून ल. ग.पटवर्धन शाळेची विद्यार्थिनी आहे तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे

Comments