रत्नागिरी जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांची रिक्त पदे भरणार~आमदार निरंजन डावखरे यांना विधान परिषदेत उत्तर
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांची रिक्त पदे भरणार
आमदार निरंजन डावखरे यांना विधान परिषदेत उत्तर
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांच्या १४ पदांपैकी ८ रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच विधान परिषदेत दिले.
भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ८ पदे रिक्त असल्याची कबुली दिली. तसेच संबंधित पदे ही सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दोन पदे भरण्याबाबतनागरी सेवा मंडळाची शिफारस घेऊन सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी फाईल सादर करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदही लवकरच भरले जाईल. उर्वरित पाच रिक्त खातेप्रमुखांची पदे भरण्याबाबत संबंधित विभागांना सुचना देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. मुश्रीफ यांनी आमदार डावखरे यांना लेखी उत्तरात दिली आहे.
🟤 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
*फेसबुक पेज-*
https://bit.ly/3A5B1R2
----------------------
*WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी-*
https://bit.ly/3cs7zLJ
Comments
Post a Comment