रत्नागिरीतील मि-या धूपप्रतिबंधक बंधा-याच्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपुजन; पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, खा.विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे प्रश्न जाणून घेऊन जनतेला दिलेल्या वचनांची वचन पूर्ती करणारे सरकार आहे. रत्नागिरीतील मि-या येथे धूपप्रतिबंधक बंधारा उभारणीच्या कामाला १६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचा भूमिपुजन सोहळा संपन्न होतोय. ही देखील एक वचनपूर्तीच आहे. त्याचप्रमाणे या बंधा-याला आवश्यक सुशोभरणासाठी जेवढा निधी आवश्यक आहे. तेवढा निधी नक्किच मंजूर केला जाईल. पर्यटन व रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीतील मि-या येथे आयोजीत कार्यक्रमात केले.
मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मि-या येथे समुद्रकिना-यालगत टेट्रापॉड्स व ग्रोयन धूपप्रतिबंधक बंधा-याच्या भूमिपुजन कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, अपर जिल्हाधिकारी श्री शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग, नगराध्यक्ष बंड्या साळवी, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादी प्रांतीक सदस्य बशिर मुर्तुझा, राष्ट्रवादी नेते कुमार शेट्ये आदी उपस्थीत होते.
या कार्यक्रमावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी मि-या वासियांच्या धूपप्रतीबंधक बंधारा उभारणीच्या मागणीची वचन पूर्ती केली आहे. रत्नागिरीच्या विमानतळाला आणखी जमिनीची आवश्यकता असून त्यासाठी निधी द्यावा. तसेच मि-या बंधारा परिसर सुसोभिकरणासाठी आणखी काही सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी पालकमंत्री अनिल परब म्हणाले की मि-या परिसरात सुमारे साडे तीन किलोमीटर पर्यंत बंधारा होणार असून या बंधा-याचे नाव जगाच्या नकाशावर येईल. यासाठी आवश्यक निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी कमी पडू दिला नाही. अजितदादा नेहमीच हात न आखडता कोकणच्या विकासासाठी भरभरुन देत असतात असे मत व्यक्त केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनीही भाषण केले.
Comments
Post a Comment