भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लि. चे संचालकपदी निवड
रत्नागिरी -
भारतीय जनता पार्टीचे द.रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांची आज गोवा शिपयार्ड या भारत सरकारचे अधिन असलेल्या महामंडळाचे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून भारत सरकाचे कमीटी ऑफ कॅबिनेट कडून नियुक्ती करण्यात आली. या बाबत भारत सरकारचे अवर सचिव यांनी नोटीफीकेशन काढले आहे.
ही नियुक्ती ३ वर्षासाठी झाली असून यामुळे एक वेगळया क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली आहे व त्याचा उपयुक्त वापर मी करेन असे याप्रसंगी ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. गोवा शिपयार्ड ही वास्को येथे मुख्यालय असलेले भारत सरकार संचलित महामंडळ असून जहाज बांधणी व विविध रक्षा उपकरणे बनविली जातात. त्याचा संचालक म्हणून काम करणे ही एक देशसेवाच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून झालेली ही नियुक्ती माझ्यासाठी अत्यंत मोलाची असून या नियुक्ती बद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी व सर्व सन्माननीय भाजपा नेते यांचे प्रती ॲड.दीपक पटवर्धन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सदिच्छा व सहकार्य यामुळे ही संधी मला प्राप्त झाली आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा