रत्नागिरी:शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी येथे नव्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत आहे. या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम वर्ष, प्रथम फेरीचे प्रवेश (CAP Round 1) 10 डिसेंबर 2021 पर्यंत दुपारी ०३.०० वाजेपर्यंत पार पडतील.
संस्थेतील प्रवेशासंबंधीत माहिती संस्थेच्या www.gcocr.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रथम फेरीत २१६ विद्यार्थ्यांना संस्थेतील जागांचे वाटप करण्यात आले. प्रवेशाची दुसरी फेरी (CAP Round 2) १८ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान राहिल.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी सध्याच्या उपलब्ध वेळापत्रकाप्रमाणे द्यावयाचे अद्यावत पर्याय १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२१ पर्यंत देणे आवश्यक आहे. यासाठी अधिक व अद्यावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी CET Cell च्या संकेतस्थळाला भेट द्यावी. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने कळविलेले आहे.
नुकताच सर्व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा Infosys सोबत करार झालेला आहे. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी ही संस्था "आदर्श संस्था” म्हणून विकसीत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्ष प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मुख्य समन्वयक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment