देशात कॉंग्रेसशिवाय तिसरी आघाडी अशक्य, २०२४ ला मोदी सत्तेत येत नाहित, २०२४ नंतर मोदी देशात राहतील की नाही ही देखील शंका आहे: माजी खासदार हुसैन दलवाई

संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण आहे. सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरुन देशात तिसरी आघाडी केली जाणार का? ही तिसरी आघाडी कॉंग्रेस शिवाय असू शकते का याबाबत उलट सुलट चर्चा आहेत. मात्र देशात कॉंग्रेस पक्षाला वगळून कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. तशी झालीच तर त्यामुळे भाजपलाच फायदा होईल. त्यामुळे देश पातळीवर कॉंग्रेस पक्षाला वगळून तिसरी आघाडी करण्याचा निर्णय होऊ शकणार नाही असे मत कॉंग्रेस पक्षाचे नेते व माजी खासदार हुसैन दलवाई यांनी व्यक्त केले आहे. 
दैनिक फ्रेश च्या प्रतिनिधींनी माजी खासदार हुसैन दलवाई यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुढे माजी खासदार हुसैन दलवाई म्हणाले की २०२४ ला मोदींची सत्ता देशात येणार नाही. २०२४ मोदी देशात राहतील की नाही ही देखील शंका आहे. मोदींनी खुप पापे केली आहेत. आणि जनता त्यांना धडा शिकवेल. देशात फॅसिस्ट्स च्या विरोधात लढाई सुरु आहे. ममता बॅनर्जी या युनियन पब्लिक अलायन्समध्ये नव्हत्या. शरद पवार युपीए मध्ये होते त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी युपीए बद्दल ते वक्तव्य केले असेल. शरद पवार तसे बोलणार नाहित.
कॉंग्रेसला वगळून तिसरी आघाडी अशक्य आहे असे मत हुसैन दलवाई यांनी व्यक्त केले आहे. 

Comments