फ्लॅट चा करारनामा करत परस्पर विक्री ; 95 लाखाची फसवणूक
फ्लॅट चा करारनामा करत परस्पर विक्री ; 95 लाखाची फसवणूक
फ्रेश न्यूज प्रतिनिधी : नाशिक
फ्लॅट विक्रीचा व्यवहार झालेला असतांना त्याच फ्लॅट चे दुसऱ्या पार्टी सोबत साठेखात करारनामा करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित रवींद्र धोंडू पाटील , बालाजी बिल्डर्स अँड डेव्य लपर्स ,केशव राजाराम पाटील.दिनकर दयाराम पाटील, संजयसिंग दौलतसिंग परदेशी यांच्या विरोधात भा द वि कायदा कलम 406, 420, 504,506, 34 अन्वये गंगापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .. अविनाश येवले यांनी यांच्या गंगापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार अर्ज नुसार ,संशयित रवींद्र पाटील व केशव पाटील यांनी आनंदवलीतील कृष्ण कृपा अपारमेन्ट मधील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटची हात उसनवार पावतीत दस्त लाभात नोंदवून नोटरी केली. त्या बदल्यात 98 लाख 20 हजार धनादेश व रोख स्वरूपात द्वारे घेतले.साठेखत करारनामा लिहून दिला होता. हा व्यवहार झालेला असतांना संशयितांनी दोन्ही फ्लॅटचा साठेखत करारनामा करून विक्री करत फसवणूक केल्याची तक्रार दिली. वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
Comments
Post a Comment