पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळा भारताशी संलग्न 930 संस्थांचे अघोषित एकूण 20,353 कोटी रुपये आढळले

नवी दिल्ली- पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित भारताशी संलग्न 930 संस्थांचे 01.10.2021 पर्यंत, अघोषित एकूण 20,353 कोटी रुपये आढळले आहेत. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीकच्या 52 (बावन्न) प्रकरणांमध्ये, काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत फौजदारी खटल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 130 प्रकरणांमध्ये काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्यामधील आतापर्यंत करांची 153.88 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे, असे यासंदर्भात अधिक तपशील देताना मंत्र्यानी सांगितले.

Comments