गावडे आंबेरे येथे मोबाईल शॉपी मधून 6 मोबाईलसह 10 हजारांची रक्कम लांबविले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी
तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे मोबाईल शाॅपी फोडून अज्ञाताने ६ मोबाईल व १०,००० रुपयांची रोख रक्कम लांबवली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रसाद लहूकांत पुनसकर (२५,रा. गावखडी, सुतारवाडी रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावडे आंबेरे येथील विश्वकर्मा मोबाईल येथील १५ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १६ डिसेंबर सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास ही घटना घडली आहे. अज्ञाताने मोबाईल शाॅपी मधून आय टेल कंपनीचे ६ मोबाईल व १०,००० रोख रक्कम अशी 23 हजार 999 रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश गावीत करीत आहेत.
Comments
Post a Comment