रत्नागिरी जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीसाठी 58 कोटी 57 लाख रुपये एवढ्या निधीला मान्यता: अध्यक्ष विक्रांत जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी शासनाने 58 कोटी 57 लाख रुपये एवढ्या निधीला मान्यता दिली आहे. याबाबतची सविस्तर माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दिली. 20 मार्च 2021 रोजी विक्रांत जाधव यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेपासून अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी वेळोवेळी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात बैठका आयोजित करून प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले. राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाच कोटी रुपयांचा निधी ची तरतूद करू असे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद नूतन इमारत उभारणीचा सविस्तर प्रस्ताव 29 नोव्हेंबर रोजी हाय पॉवर कमिटीकडे सादर करण्यात आला. एकूण खर्च 58 कोटी 57 लाख एवढा होणार आहे. हा निधी शासनाने मंजूर केला आहे. याबद्दल अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार अधिकारी यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिशदेला उपाध्यक्ष उदय बने देखील ऑनलाईन उपस्थीत होते.
Comments
Post a Comment