रत्नागिरी जिल्ह्यातील 52,647 विद्यार्थ्यांना मिळणार पहिला गणवेश

रत्नागिरी जिल्ह्यात या वर्षी विद्यार्थ्यांना पहिला गणवेश मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 52,647 विद्यार्थ्यांना पहिला गणवेश मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शाळांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळा व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी बाबतचा निर्णय घेईल. सर्व शिक्षा अभियानातून मोफत गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपये प्रमाणे 1,57,94,100 रुपये एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे.

Comments