कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज
कोविड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक, वारसांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे. त्यानंतर https://epassmsdma.mahait.org/login.html या लिंकलवर जाणे आवश्यक आहे.
अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाण पत्र (पीडीएफ, जेपीजी), अर्जदाराचा आधार संलग्न बॅंक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी),आणि रुग्णालयाचा तपशिल आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोविड १९ चे निदान झाले असे कागदपत्र (पीडीएफ, जेपीजी), तसेच कुटुंबातील सर्व वारसांचे हमीपत्र व स्वयंघोषणा पत्र अपलोड करावे.
या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी लॉग ईन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in वर Document Required या टॅब वर उपलब्ध आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment