देवरूख नगर पंचायत कार्यक्षेत्राकरिता साखरपा येथून 33 के.व्ही. विद्युत लाईन टाकण्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे संबंधित विभागाला तपासून कार्यवाही करण्याबाबतचे दिले आहेत निर्देश; आमदार शेखर निकम व नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी केला होता पत्रव्यवहार

देवरूख नगर पंचायत कार्यक्षेत्राकरिता साखरपा येथून 33 के.व्ही. विद्युत लाईन टाकण्याच्या मागणीला नगराध्यक्ष मृणाल शेट्ये व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांनी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे तसा पत्रव्यवहार केला आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्राकरीता संगमेश्वर येथून ३३ के.व्ही. ची विद्युत लाईन टाकणेत आली आहे. परंतु दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे सदरची विद्युत लाईनमध्ये सातत्याने बिघाड होत असतो. त्यामुळे देवरुख नगर पंचायती मार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा व इतर सेवा यावर त्याचा परिणाम होत असून त्याचा नाहक त्रास देवरुख मधील सर्वसामान्य जनतेला होत आहे. तरी याकरीता पर्याय म्हणून देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्राकरीता साखरपा येथून ३३ के.व्हिची विद्युत लाईन टाकून मिळावी जेणेकरून दरवर्षी पावसाळ्यात सातत्याने होणाऱ्या विद्युत वाहिनीच्या बिघाडापासून देवरुखवासियांची मुक्तता होईल, तरी यासंदर्भात संबंधित विभागास निर्देश होणेस विनंती आहे. अशा आशयाचे पत्र आमदार शेखर निकम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सादर केले होते. या पत्रावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरण विभागाला तपासून कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. 
देवरूख नगर पंचायत कार्यक्षेत्राकरिता साखरपा येथून 33 के.व्ही. विद्युत लाईन टाकण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली होती. त्या मागणीवरुन तात्काळ आमदार शेखर निकम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार केला. 

Comments