झरेवाडी-हातखंबा येथील वाघजाई सहकारी संस्थेत 15 लाख २३ हजारांचा अपहार; एक अटक
रत्नागिरी:
तालुक्यातील झरेवाडी-हातखंबा येथील वाघजाई विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्थेत 15 लाख 23 हजार 717 रुपयांचा अपहार करणार्या संशयिताला न्यायालाने बुधवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संदीप दत्ताराम घवाळी (रा. गयाळवाडी-खेडशी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 या कालावधीत सहकारी संस्थेत घडली होती. लेखा परीक्षक महेश दत्तात्रय जाधव (वय 51 रा. फगरवठार) यांनी एप्रिल 2009 ते मार्च 2016 या कालावधी केलेल्या सहकारी संस्थेच्या लेखा परीक्षणाच्या तपासणीत 15 लाख 23 हजार 717 रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या अपहारात अन्य ही संशयित असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी लेखा परीत्रक जाधव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संशयित घवाळीला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले.त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनकर सुर्य करत आहेत.
Comments
Post a Comment