राजापूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उद्या जवाहर चौक एस.टी.पिकअप शेड हॉल येथे सभेचे आयोजन

गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी आडेअकरा वाजता जवाहर चौक एस.टी.पिक अप शेड हॉल येथे राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत जनजागरण मोहीम संदर्भात मार्गदर्शन, सभासद नोंदणी व क्रीयाशील सदस्य नोंदणी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद व इतर निवडणूक संदर्भात विचार विनीमय, शासकीय समित्यांमध्ये सदस्य निवड, सदर सभेसाठी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, प्रदेश सरचिटणीस, विधान परिषद माजी आमदार हुस्नबानू खलिफे, निरीक्षक एडवोकेट गुलाबराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर सभेला काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांनी, सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी प्रदेश प्रतिनिधी व सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नगरसेवक सुभाष बाकाळकर यांनी केले आहे.

Comments